Advertisement

लाॅकडाऊनमुळे विमान क्षेत्र सावरण्यास लागतील 2 वर्ष, 'इतक्या' कोटींचा बसणार फटका

लाॅकडाऊनमुळे जगभरातील ९० टक्के विमान उड्डाणे बंद आहेत. याचा मोठा फटका जगातील तसंच भारतातीलही विमान कंपन्यांना बसला आहे.

लाॅकडाऊनमुळे विमान क्षेत्र सावरण्यास लागतील 2 वर्ष, 'इतक्या' कोटींचा बसणार फटका
SHARES

लाॅकडाऊनमुळे  जगभरातील ९० टक्के विमान उड्डाणे बंद आहेत. याचा मोठा फटका जगातील तसंच भारतातीलही विमान कंपन्यांना बसला आहे.  देशातल्या विमान उद्योगाला या आर्थिक वर्षात जवळपास २५ हजार काेटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज आहे.  विमान क्षेत्राला पूर्वपदावर येण्यासाठी दाेन वर्षे लागण्याचा अंदाज क्रिसील या पतमानांकन संस्थेने वर्तवला आहे.

देशाच्या महामार्ग विकासावर झालेल्या कोराेनाच्या परिणामाच्या संदर्भातही क्रिसीलने एक अहवाल प्रसिद्ध केेला आहे. या अहवालानुुसार, मार्च ते जूनपर्यंत महामार्ग विकासकांना ३,७०० काेटी रुपयांचा टाेल महसुली ताेटा हाेणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २,२०० काेटी रुपयांचा ताेटा हाेणार आहे. परंतु, काेराेना प्रकाेप संपल्यानंतर रस्ते व महामार्ग क्षेत्राचा वेगाने विकास हाेईल. लाॅकडाऊनमुळे देशभरतील वाहतूक ठप्प आहे. परंतु, मालवाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर या क्षेत्रात वेगाने सुधारणा हाेईल.

विमान क्षेत्राला आर्थिक मदत, विमान इंधनाचा जीएसटीत समावेश करून त्याचे दर कमी करणे, विमान इंधनाची रक्कम फेडण्यासाठी जास्त कालावधी देणे, तसेच विमानतळ शुल्क माफ करणे अशी मागणी क्रिसीलने सरकारकडे केली आहे. 

जेट एअरवेज बंद असल्याने गेल्या वर्षात स्थानिक हवाई उद्याेगाचा वृद्धीदर घटून २.५ % वर आला. हा उद्याेग उभारी घेण्याचा प्रयत्नात असतानाच काेराेना मुळे पूर्णत: ठप्प झाला. कोरोना आधी विमान कंपन्यांच्या उड्डाणांमध्ये आसनांचे प्रमाण ९० टक्के हाेते. काेराेनानंतर हे प्रमाण ५० टक्के राहील. पूर्वपदावर येण्यासाठी दाेन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा