Advertisement

बँकांचे १ ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम

अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक एक ऑगस्टपासून नियमात बदल करणार आहेत.

बँकांचे १ ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम
SHARES

काही बँकांच्या व्यवहारांच्या नियमांमध्ये १ ऑगस्टपासून बदल होणार आहेत. अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक एक ऑगस्टपासून नियमात बदल करणार आहेत. यातील काही बँका पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी  शुल्क आकारणार आहेत. तर काही बँका मिनिमम बॅलन्स (खात्यातील किमान रक्कम) ची मर्यादा वाढवणार आहेत. 

अॅक्सिस बँक आता ग्राहकांना प्रत्येक ईसीएस व्यवहारावर २५ रुपये आकारणार आहे. याआधी हा व्यवहार मोफत होता. अॅक्सिस बँकेने एकापेक्षा अधिक लॉकरच्या वापरावरही शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय बँक प्रति बंडल १०० रुपयांची कँश हँडलिंग फी देखील वसूल करणार आहे. कोटक महिंद्रा बँक आता प्रत्येक महिन्यात एटीएममधील पैसे काढण्याच्या पाच मोफत व्यवहारांनंतर पुढील प्रत्येक व्यवहारांवर २० रुपये आकारणार आहे. याशिवाय खात्यात किमान शिल्लक नसल्यास बँक दंड आकारणार आहे.

 बँक ऑफ महाराष्‍ट्राच्या बचत खातेधारकांना आता आपल्या खात्यावर आधी पेक्षा अधिक मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे. बँकेने मेट्रो आणि शहरी भागात मिनिमम बॅलन्स २ हजार रुपये केला आहे, आतापर्यंत तो १५०० रुपये होता. खात्यात यापेक्षा कमी बॅलन्स असल्यास मेट्रो आणि शहरी भागात ७५ रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.  अर्धशहरी भागातील शाखांमध्ये ५० रुपये तर ग्रामीण शाखांमध्ये दंडांची रक्कम २० रुपये आकारली जाणार आहे.

आरबीएल बँकेनेही केलेल बदल १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. बँकेचे डेबिट कार्ड हरवले तर नव्या कार्डसाठी २०० रुपये, कार्ड खराब झाले तर १०० रुपये द्यावे लागणार आहेत. आता डेबिट कार्डसाठी वर्षाला २५० रुपये द्यावे लागतील. याशिवाय मेट्रो, अर्बन, सेमी-अर्बन आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना एका महिन्याला फक्त पाच मोफत व्यवहार एटीएममधून करता येतील.




हेही वाचा -

उद्योगपती अनिल अंबानीचे कार्यालय येस बँकेकडून सील

एसबीआयमध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी भरती




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा