Advertisement

अझीम प्रेमजी फाउंडेशन, विप्रो देणार 1125 कोटी रुपये

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी रिलायन्स, टाटासह अनेक उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रेटीज यांनी मोठी मदत केली आहे. आता आयटी कंपनी विप्रो आणि विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी फाउंडेशनही मदतीसाठी पुढे आले आहेत.

अझीम प्रेमजी फाउंडेशन, विप्रो देणार 1125 कोटी रुपये
SHARES

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी रिलायन्स, टाटासह अनेक उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रेटीज यांनी मोठी मदत केली आहे. आता आयटी कंपनी विप्रो आणि विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी फाउंडेशनही मदतीसाठी पुढे आले आहेत. दोघांनी मिळून ११२५ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

विप्रोच्या निवेदनानुसार, अझीम प्रेमजी फाउंडेशनने एकत्र येत मदत देऊ केली आहे.  विप्रो लिमिटेड १०० कोटी देईल, विप्रो इंटरप्रायजेस २५ कोटी आणि फाउंडेशन १००० कोटी रुपये देणार आहेत. ही रक्कम वार्षिक सीएसआर रकमेपेक्षा वेगळी असून यासोबत अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या कल्याणकारी खर्चाव्यतिरिक्त आहे. हा पैसा संसर्गजन्य परिसरातील लोकांची मदत, आराेग्य सुविधांवर खर्च केली जाईल.याची अंमलबजावणी प्रेमजी फाउंडेशनच्या १६०० कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे होईल.

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे करत कोट्यवधींची मदत केली आहे. रिलायन्स ग्रुपने ५०० कोटींची, टाटा ट्रस्टने ५०० कोटी मदत केली आहे.  



हेही वाचा -

धक्कादायक!.. आईसह ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा