बॅंक कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार


  • बॅंक कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार
SHARE

सीएसटी - आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी देशभरातील सुमारे 10 लाख बँक कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. या संपात देशभरातील खासगी, विदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आझाद मैदान येथे निदर्शने केली.
नोटाबंदीनंतर बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केलं, पण दोन महिने होऊन गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. शिवाय बाजारात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. परंतु, 500 आणि 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा तपासणाऱ्या मशिन अद्याप एकाही बँक शाखेत पुरवलेल्या नाहीत. तसेच मोठ्या प्रमाणात कायमस्वरुपी कामासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे थांबवून तातडीने कायमस्वरुपी तत्त्वावर कर्मचारी भरती करण्याची संघटनेने मागणी केली असल्याचे विश्वास उटगी यांनी सांगितले. 

बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या

- कायमस्वरुपी अंमलबजावणीसाठी काम केलेल्या बॅंक कर्मचारी आणि  अधिकाऱ्यांना कामाचा जादा मोबादला मिळावा

- ग्रॅज्युइटी कायद्यात बदल करून ग्रॅज्युइटीच्या मर्यादेत वाढ करावी

- निवृत्तीवेळी मिळणारे आर्थिक लाभ पूर्णपणे आयकर मुक्त असावे

- सर्व बॅंका आणि वित्तीय संस्थातील कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांच्या 

- रिक्त जागी त्वरीत नेमणुका केल्या जाव्यात

- पेन्शन संबंधित प्रश्न वाटाघाटी करून सोडवावेत

- अनुकंपा आधारावर कर्मचारी भरती योजना सर्व बॅंकांतून त्वरीत अंमलात आणावी


संबंधित विषय
ताज्या बातम्या