Advertisement

शनिवारपासून बँका सलग ४ दिवस राहणार बंद!

सलग ४ दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प होण्यासोबतच बाजारात रोख रकमेचा तुटवडाही जाणवेल. कारण शुक्रवारनंतर बँकेकडून एटीएममध्ये रोख रक्कम जमा होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला रक्कम काढण्यासाठी ग्राहकांचा कल एटीएमवरच असेल.

शनिवारपासून बँका सलग ४ दिवस राहणार बंद!
SHARES

बँक ग्राहकांनो बँकेचे व्यवहार करायचे असतील, तर शुक्रवारीच उरकून घ्या. कारण शनिवारपासून बँका सलग ४ दिवस बंद राहणार आहेत. परिणामी आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येऊ शकते. एटीएमवर दबाव येऊन रोख रकमेची टंचाईही निर्माण होऊ शकते.


कारण काय?

२८ एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. २९ एप्रिलला रविवारी साप्ताहीक सुट्टी असल्याने बँकेचे व्यवहार पूर्णपणे बंद असतील. सोमवारी बुद्ध पौर्णिमेची शासकीय सुट्टी असल्याने या दिवशीही बँका बंद राहतील. तर मंगळवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असल्याने बँका बंद असतील.


एटीएमवर भार

सलग ४ दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प होण्यासोबतच बाजारात रोख रकमेचा तुटवडाही जाणवेल. कारण शुक्रवारनंतर बँकेकडून एटीएममध्ये रोख रक्कम जमा होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला रक्कम काढण्यासाठी ग्राहकांचा कल एटीएमवरच असेल.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागासोबत दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, तेलंगाना, झारखंडमध्ये रोख रकमेचा तुटवडा झाल्याने बँक ग्राहक हैराण झाले होते.


ऑनलाइनचा आधार

भलेही या ४ दिवसांमध्ये बँका बंद राहणार असल्या, तरी तुम्हाला आॅनलाइन पैशांची देवाण-घेवाण करता येईल. यूपीआय, आयएमपीएस द्वारे मनी ट्रान्सफरची सेवा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहील.



हेही वाचा-

पेट्रोल@८२.४८, किंमती ३ वर्षांच्या उच्चांकी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा