Advertisement

५ दिवस बॅंकांचे व्यवहार राहणार बंद, कर्मचारी जाणार संपावर

बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून बँक कर्मचाऱ्यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं, या संपावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

५ दिवस बॅंकांचे व्यवहार राहणार बंद, कर्मचारी जाणार संपावर
SHARES

ख्रिसमस, इयर एंडच्या निमित्ताने फॅमिली किंवा मित्रमंडळींसोबत आऊटिंगचा प्लान आखत असाल, तर त्याची आधीच तजवीज करून ठेवा, बॅंकांचे व्यवहार झाले नसतील तर, २१ डिसेंबरपूर्वीच उरकून घ्या, खासकरून बुकींगचं पेमेंट योग्य वेळेत करून टाका. कारण बँक कर्मचारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी 'ऑल इंडिया बँक ऑफिसर काॅन्फडरेशन'ने (AIBOC) संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २१ ते २५ डिसेंबर असे सलग ५ दिवस बॅंकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. ५ दिवस बँका बंद राहिल्याने चेक क्लिअरन्स होण्यास वेळ लागू शकतो. एटीएममध्येही पैशांची कमतरता भासू शकते.

कुठल्या कारणासाठी बंद?

बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून बँक कर्मचाऱ्यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं, या संपावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

'अशा' राहतील बँका बंद

२१ डिसेंबरला शुक्रवार असून, त्याच दिवसापासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे. २२ आणि २३ डिसेंबरला चौथा शनिवार, रविवार असल्यानं बँकांना सुट्टीच राहणार आहे. २४ डिसेंबरला सोमवारी बँका उघडतील, परंतु या दिवशी बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे. तर, २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्यानं बँका पुन्हा बंद राहतील.

चांगली वेतनवाढ हवी

नॅशनल ऑर्गनाइजेशन ऑफ बँक वर्करचे उपाध्यक्ष अश्वनी राणा म्हणाले की, '' देशभरात १० लाख बँक कर्मचारी आहेत. बँक युनियन या संपाद्वारे केंद्र सरकारकडे २५ टक्के वेतनवाढीची मागणी करणार आहे. सरकारने बँकेच्या माध्यमातून अनेक योजना लागू केल्या आहेत. एवढंच नव्हे, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही घसघशीत वाढ केली आहे. असं असताना बँक कर्मचाऱ्यांच्या पदरात मात्र कमी वेतनवाढ पडली आहे.''हेही वाचा-

शक्तीकांत दास आरबीआयचे नवे गर्व्हनर

विजय माल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा