बँकांचे व्यवहार सुरळीत

 Pali Hill
बँकांचे व्यवहार सुरळीत

मुंबई - गुरूनानक जंयतीच्या सुट्टीनंतर मंगळवारी पुन्हा बँका सुरू झाल्या. नेहमीपेक्षा एक तास लवकर बँका सुरू करण्यात आल्या. त्यामुळे मंगळवारी बँकामध्ये सुरळीत व्यवहार सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मागील चार दिवसांपेक्षा गर्दीचं प्रमाण कमी होतं. त्यातच वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने घेतलं जात असल्याची प्रतिक्रीया बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांनी दिलीय. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्राध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. नेहमी पेक्षा बँकेचे नियोजन चांगलं असल्यानं लोकांचा वेळ वाचतोय अशी प्रतिक्रीया अशोक गाडगीळ या बँक खातेदारानं दिली. त्यातच आता पैसे काढण्याची मर्यादाही 24 हजार केल्यानं लोकांना दिलासा मिळातोय. त्यातच 500 रुपयांच्या 50 लाख नोटा देशभरात वितरित करण्यात आल्यात त्यामुळेही लोकांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी झालाय.

Loading Comments