Advertisement

पगार देण्यात मुंबई दुसऱ्या क्रमांकावर


पगार देण्यात मुंबई दुसऱ्या क्रमांकावर
SHARES

अार्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई पगार देण्यातही अव्वल अाहे. देशात पगार देण्यात मुंबई दुसऱ्या स्थानावर अाहे. अायटी हब असलेल्या बंगळुरूमध्ये नोकरदारांना सर्वाधिक वेतन मिळते. त्यापाठोपाठ मुंबई अाणि दिल्लीमध्ये सर्वाधिक पगार दिला जातो. 'लिंक्डइन'नं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर अाली 


१५ लाख वार्षिक वेतन 

बंगळुरात हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग, सॉफ्टवेअर अॅण्ड आयटी सर्व्हिसेस आणि कन्झ्युमर क्षेत्रात गलेलट्ठ पगार अाहेत. बंगळुरूमध्ये या क्षेत्रात सर्वाधिक पगार दिले जात अाहेत. 'लिंक्डइन'च्या अहवालानुसार, हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग या क्षेत्रातील नोकरदारांना १५ लाख रुपये वार्षिक वेतन दिलं जातं. तसंच सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरदारांना १२ लाख आणि कन्झ्युमर क्षेत्रातील नोकरदारांना ९ लाख रुपये वार्षिक वेतन मिळतं. 



हेही वाचा - 

श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत आमदार लोढा अव्वल स्थानी

मार्चअखेरपर्यंत देशातील ५० टक्के एटीएम बंद होणार?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा