Advertisement

पालिका कर्मचाऱ्यांचा जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार


पालिका कर्मचाऱ्यांचा जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार
SHARES

मुंबई - नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदीचा आदेश दिल्यानंतर सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला, असाच काहीसा अनुभव आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही आला. घाटकोपरमधील बीएमसीच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये आरटीआयमध्ये मागितलेल्या कागदपत्रांची फी भरण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून ५०० रुपयांंची नोट घेण्यास बीएमसी कर्मचाऱ्याने नकार दिला. त्यामुळे आरटीआयचे २८६ रुपये गलगली यांना चेकच्या स्वरुपात द्यावे लागले. एका बाजूला महानगरपालिका करासाठी ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारत आहे, तर दुसरीकडे या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याचं चित्र दिसत आहे.

संबंधित विषय
Advertisement