Advertisement

ब्राव्हो मुकेश!, फेसबुक-जिओ कराराचे आनंद महिंद्रांकडून कौतुक

फेसबुक आणि रिलायन्स जिओमध्ये नुकताच ४४ हजार कोटी रुपयांचा करार झाला. याबद्दल महिंद्रा उद्योग समूहाचे आनंद महिंद्रा यांनी टि्वट करुन मुकेश अंबानी यांचं कौतुक केलं आहे.

ब्राव्हो मुकेश!, फेसबुक-जिओ कराराचे आनंद महिंद्रांकडून कौतुक
SHARES

 फेसबुकने रिलायन्स जिओचे 9.9 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. दोन्ही कंपन्यांमध्ये नुकताच ४४ हजार कोटी रुपयांचा करार झाला. याबद्दल महिंद्रा उद्योग समूहाचे आनंद महिंद्रा यांनी टि्वट करुन मुकेश अंबानी यांचं कौतुक केलं आहे. ब्राव्हो मुकेश, हा केवळ दोन कंपन्यांमधील करार नाही, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.  

टि्वटमध्ये आनंद महिंद्रा म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे हे फेसबुक आणि जिओमधील करारानंतर समोर आलं आहे.  या करारामुळे  २१ वे शतक भारताचे असेल ही कल्पना प्रत्यक्षात येईल. विकासाचे केंद्र म्हणून जग भारताकडे पाहील.

 सोशल मिडीया कंपनी फेसबुकने  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये  ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. बुधवारी फेसबुकने जिओसोबत भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. यानुसार फेसबुकने जिओमधील ९.९९ टक्के शेअर विकत घेतले आहेत. भारतीय टेक क्षेत्रातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आहे.

या गुंतवणुकीमुळे मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला  भारतातील डिजिटल मार्केटमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवता येणार आहेत. तर याचा मोठा फायदा जिओलाही होणार आहे.  फेसबुक आणि जिओमधील या करारामुळे जिओ अॅप्स प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होणार आहे. तर हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -  

वाइन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

मुंबईत कोरोनाचे एकूण ४२३२ रुग्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा