Advertisement

लस घेणाऱ्यांना मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची योजना

कोरोना लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आता एक अभिनव योजना आणली आहे.

लस घेणाऱ्यांना मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची योजना
SHARES

कोरोना लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आता एक अभिनव योजना आणली आहे. यामध्ये ज्या लोकांनी लस घेतली आहे त्यांना मुदत ठेवींवर (एफडी) जास्त व्याज दिलं जाणार आहे. 

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने इम्यून इंडिया डिपॉझिट' या नावाने फिक्स्ड डिपॉझिट योजना लॉन्च केली आहे. या अंतर्गत नवीन मुदत ठेवींवर ०.२५ टक्के अधिक व्याज दिलं जाणार आहे. कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येईल. त्यांना चालू व्याज दरापेक्षा ०.२५ टक्के ज्यास्त व्याज मिळेल. तसंच, कोरोना लस घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना ०.५० टक्के जास्त व्याज दिले जाईल. लस न घेणाऱ्यांना या स्कीमचा फायदा घेता येणार नाही.

बँकेने सोशल मीडिया पोस्टमध्ये या योजनेची माहिती दिली आहे.योजनेचा मॅच्योरिटी पीरियड ११११ दिवसांचा आहे. ही योजना ठराविक काळासाठी लॉन्च केली आहे. जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना बँकेने आणली आहे. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सध्या ७ दिवस ते १० वर्षापर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटवर २.७५  ते ५.१ टक्के पर्यंत व्याज देते.



हेही वाचा - 

आर्थिक गुन्हे शाखेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा