Advertisement

पर्ससीन नेट मासेमारीवर अखेर केंद्र सरकारची बंदी


पर्ससीन नेट मासेमारीवर अखेर केंद्र सरकारची बंदी
SHARES

एलईडी दिवे आणि बुलनेट ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करण्यावर देशव्यापी बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देशभरात सुरू झाली आहे. केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री राधा मोहन सिंह यांनी देशव्यापी बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवर ही बंदी लागू करण्यात आली असून सागरी पोलिसांवर या बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी टाकण्यात येणार आहे. सागरी धन संवर्धनाच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.


छोट्या मच्छीमारांचा धंदा संकटात

काही वर्षांपूर्वी ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी केली जात होती. यात कालांतराने बदल होत गेला. काही स्थानिक मच्छीमारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना बुलनेट तसेच पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करण्यास सुरुवात केली. यात बुलनेट पद्धतीने होणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यातील मासळी हिरावली जात होती. यामुळे बुलनेटच्या मासेमारीस बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मच्छीमारांमधून केली जात होती. अखेर या मासेमारीवर बंदी घालण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.


'पारंपरिक मच्छीमारांचा हा विजय'

अत्याधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. हा प्रकार असाच चालू राहिल्यास माशांची संख्या घटून अशा लहान मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा येण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बंदी स्वागतार्ह असल्याचे मत पारंपरिक मासेमारी करणारे मच्छीमार व्यक्त करत आहेत.


'नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज'

अत्याधुनिक मासेमारी अशाच प्रकारे चालू राहिल्यास मत्स्यदुष्काळ पडण्याची भीती होती. आता केंद्र सरकारने बंदी लागू केल्याने त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी महाराष्ट्र मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली आहे. तसेच, राज्यातील जेट्टींवर सागरी पोलीस तैनात करून एलईडी दिवे वापरणारे ट्रॉलर, तसेच जनरेटर व अन्य संबंधित साहित्य आणण्यास बंदी घालून तसे काही साहित्य आढळल्यास ते जेट्टीवरच जप्त केले जावे असेही तांडेल यावेळी म्हणाले.


...तर जानकरांची प्रेतयात्रा काढू - तांडेल

दरम्यान, महादेव जानकरांनी पर्ससीन नेटला अभय दिले असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी न केल्यास राज्यभर त्यांचा निषेध करत प्रेतयात्रा काढू असा इशारा दामोदर तांडेल यांनी दिली आहे. तसेच, जानकर पर्ससीन नेट वापरणाऱ्या मोठ्या बोटींकडून हफ्ता घेत असल्याचा धक्कादायक आरोपही तांडेल यांनी यावेळी केला.



हेही वाचा

शिवस्मारकाला मच्छीमारांचा विरोध


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा