सरकारने रद्द केले 11.44 लाख पॅनकार्ड

  Mumbai
  सरकारने रद्द केले 11.44 लाख पॅनकार्ड
  मुंबई  -  

  केंद्र सरकारने काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी 11.44 लाखाहूनही अधिक पॅनकार्ड नंबर रद्द केले आहेत. केंद्रिय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी बुधवारी ही माहिती संसदेत दिली. ज्यांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्ड तयार केले आहेत त्यांचे पॅनकार्ड रद्द करण्यात आले आहे. 27 जुलैपर्यंत 11,44,211 पॅनकार्ड रद्द करण्यात आले असल्याची माहिती गंगवार यांनी दिली.


  कशी ओळखाल तुमच्या पॅन कार्डची सध्य स्थिती?

  सर्वात आधी इन्कम टॅक्सच्या http://incometaxindiaefiling.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करा
  साईटच्या डाव्या बाजूला KNOW YOUR PAN पर्याय दिसेल

  तिथे एक फॉर्म असेल, यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्या
  संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी नंबर मिळेल
  संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा पॅन कार्ड सुरू आहे का याची माहिती मिळेल  हेही वाचा -

  आता पॅन कार्डसोबत जोडा आधारकार्ड


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.