केंद्र सरकारने वेगवेगळ्या छोट्या गुंतवणुकीच्या योजनांवरील व्याजदरात मंगळवारी रात्री ०.७ ते १.४ टक्क्यांपर्यत कपात केली आहे. यामुळे आता ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना आदी योजनांवर कमी व्याज मिळणार आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेवर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांसाठी आता ७.६ टक्के इतकेच व्याज मिळेल. आधी योजनेत ८.४ टक्के व्याजदर होता.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ७.९ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यत कमी करण्यात आला आहे. तर किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्याजदरातील बदलाला मंजुरी दिली आहे. छोट्या गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात कपात झाल्यामुळे यापुढे एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरही कमी व्याज मिळणार आहे. या मुदत ठेवींसाठी आधी ६.९ टक्के व्याज मिळत होते. ते आता ५.५ टक्के इतकेच मिळणार आहे.
हेही वाचा -