Advertisement

सीएनजी गॅसच्या किमतीत वाढ, मुंबईत आहेत 'इतके' दर

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून वाढ होणार आहे.

सीएनजी गॅसच्या किमतीत वाढ, मुंबईत आहेत 'इतके' दर
SHARES

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीनं मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ केली आहे. या दरवाढीनं मुंबईतील लाखो रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

महानगर गॅस लिमिटेडकडून CNG गॅस दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. वाहतूक आणि इतर खर्च वाढल्यानं सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्याचं कारण महानगर गॅस लिमिटेडनं दिलं आहे. त्यानुसार सीएनजीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात येणार आहे.

या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीचा भाव एक किलोसाठी ५१.९८ रुपये इतका वाढेल. तर पाईप गॅससाठी ग्राहकांसाठी प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार स्लॅब-१ साठी ३०.४० रुपये प्रती युनिट आणि स्लॅब-२ साठी ३६ रुपये प्रती युनिट दर असेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

या महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यानी घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ केली होती. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली होती. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. मुंबईत घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर ८३४.५० रुपये आहे.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये आहे तर डिझेलचा भाव ९७.२९ रुपये आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी ६७ टक्क्यांनी स्वस्त आहे. तर डिझेलच्या तुलनेत सीएनजी ४७ टक्क्यांनी स्वस्त आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या सीएनजी पाईप गॅस ३५ टक्क्यांनी स्वस्त असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.



हेही वाचा

मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांहून अधिकचा आकडा गाठला

घरगुती सिलेंडर महागला, आता मोजावे लागतील 'इतके' पैसे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा