Advertisement

मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांहून अधिकचा आकडा गाठला

मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांहून अधिकचा आकडा गाठला आहे.

मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांहून अधिकचा आकडा गाठला
SHARES

मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांहून अधिकचा आकडा गाठला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.२५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९७.०९ रुपये आहे. तर दिल्लीत हा दर १००.२१ रुपये तर डिझेलचा दर ८९.५६ रुपये प्रती लीटर आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज डिझेलच्या दरात १३ ते १८ पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत ३३ ते ३५ पैशांनी वाढलं आहे. निवडणुकांचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर मोठ्या प्रमाणात बदल होतो. ५ राज्यांच्या निवडणुकांचा पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठा बदल झाला आहे.

अनेक राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियांमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणताच बदल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाला नाही. या दरम्यान कच्चा तेल महागल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. मात्र गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एवढी वाढ झाली की यामुळे सामान्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे गेल्या ३७ दिवसांत ९.८९ रुपये म्हणजे जवळपास १० रुपयांनी पेट्रोल वाढलं आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा