Advertisement

बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्यासाठी 'ही' आहे शेवटची मुदत

तुम्ही आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड लिंक केलं नसलं तर ते तात्काळ करून घ्या. कारण तुमचं बँक खातं फ्रीज किंवा स्थगित केलं जाऊ शकतं.

बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्यासाठी 'ही' आहे शेवटची मुदत
SHARES

तुम्ही आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड लिंक केलं नसलं तर ते तात्काळ करून घ्या. कारण तुमचं बँक खातं फ्रीज किंवा स्थगित केलं जाऊ शकतं. केंद्र सरकारने बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीपर्यंत लिंक न केल्यास तुमचं बँक खातं फ्रीज होऊ शकतं. 

या पद्धतीने ऑनलाईन करा लिंक

- ऑनलाईन पद्धतीने लिंक करण्यासाठी इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगइन करावं लागेल.

- या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी पर्याय दिसेल

- तुमचं खातं एसबीआयमध्ये असलं तर  www.onlinesbi.com या वेबसाईटवर जाऊन My Accounts या पर्यायामध्ये जाऊन  Link your Aadhaar number या पर्यायावर जा.

- इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.

- त्या नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाचे शेवटचे दोन अंक दिसतील

- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला याबाबत तपशील मिळेल

असं करा ऑफलाइन लिंक

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लिंक करू शकत नसाल तर बँकेत जाऊन देखील हे काम करू शकता. बँकेत जाऊन तुम्हाला आधारकार्डची कॉपी देणं गरजेचं आहे. याठिकाणी एक फॉर्म भरून दिल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला याची माहिती दिली जाईल. 

महत्त्वाचं म्हणजे आधारकार्ड वरील मोबाईल क्रमांक आणि बँकेतील मोबाईल क्रमांक एक असणं गरजेचं आहे. हे दोन्ही क्रमांक वेगवेगळे असल्यास लिंक होणार नाही.

आधार लिंक झालं की नाही कसं पहाल 

-uidai.gov.in या वेबसाइट्वट जा.

- याठिकाणी Aadhaar Services वर क्लिक करा.

- यानंतर Check Aadhaar & Bank Account Linking Status या पर्यायावर क्लिक करा

- येथे क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल

- या ठिकाणी १२ अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे

- आधार क्रमांक टाकल्यावर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल

- मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर लिंकिंग स्टेटस दिसतं.

मोबाईल क्रमांकावरून तपासा

तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून *99*99*1# डायल करून तुमचा आधार क्रमांक टाका. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याबाबत माहिती मिळेल.



हेही वाचा -

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा