
देशातील इंधनांच्या दरात होत असलेली वाढ कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. पण पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे. १८ व्या दिवशी पेट्रोलचे दर स्थिर असून डिझेलची किंमत वाढली आहे. बुधवारी डिझेल ४८ पैशांनी वाढलं आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत डिझेल प्रति लिटर ७९.४० रुपये तर पेट्रोल ७९.७६ रुपये आहे. पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही.
कोलकातामध्ये पेट्रोल ८१.४५ तर डिझेल ७४.६३ रुपये प्रति लिटर दरानं मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ८६.५४ रुपये तर डिझेल ७१.५८ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नई इथं पेट्रोलची किंमत ८३.०४ तर डिझेलची किंमत ७६.७७ रुपये आहे. १८ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत साधारण ८.५० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर, गेल्या १८ दिवसांत डिझेल १०.२५ रुपयांनी महाग झालं आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत देशात सर्वात कमी दिल्लीमध्ये इंधनावर लागणारा कर होता. तर सर्वाधिक मुंबईत होता. ४ मे रोजी दिल्ली सरकारनं डिझेलवरील व्हॅट १६.७५ टक्क्यांनी वाढवून ३० केल्यानंतर दिल्लीमध्ये डिझेलची किंमत मुंबईपेक्षाही वाढली आहे. पेट्रोलवरचा व्हॅटही वाढवला, आधी २७ टक्के असलेला व्हॅट आता ३० टक्के करण्यात आल्यामुळे पेट्रोलच्या दरात १.६७ रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलचे दर ७.१० रुपयांनी वधारले.
पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता.
देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
हेही वाचा
