Advertisement

७ दिवसांत आधार-पॅन लिंक करा, नाहीतर...

तुम्ही तुमचे पॅन आणि आधार लिंक नाही केले तर याचा आर्थिक फटका बसू शकतो. जाणून घ्या कसं लिंक करायचं आणि नाही केलं तर किती नुकसान होऊल...

७ दिवसांत आधार-पॅन लिंक करा, नाहीतर...
SHARES

तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक केले का? नसेल केले तर तुमच्यासाठीच एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता अवघे ७ दिवस शिल्लक राहिले आहे. तत्पूर्वी तुम्ही तुमचे पॅन आणि आधार लिंक नाही केले तर याचा आर्थिक फटका बसू शकतो.

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळामध्ये (Aadhar Card) आणि पॅन (Permanent Account Number PAN) लिंक करण्याची तारीख वाढवण्यात आली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) पॅन-आधार लिंकिंगची डेडलाइन ही ३० जूनपर्यंत केली होती. यापूर्वी दोन्ही दस्ताऐवज जोडण्याची तारीख ३१ मार्चपर्यंत होती. त्यानंतर  यात वाढ करून ३० जून करण्यात आली.

मात्र ३० जून या डेडलाइन आधी तुम्ही हे दोन दस्तावेज लिंक केले नाही तर तुम्हाला दंड देखील बसू शकतो. आयकक कायदा 272B अंतर्गत तुम्हाला १० हजाराचा भुर्दंड पडू शकतो. याशिवाय तुम्हाला मोठी रक्कम बँक खात्यातून काढायची असेल किंवा भरायची असेल तर, अडचणी येऊ शकतात. आधारशी लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन निष्क्रिय राहील. परिणामी हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करता येणार नाही.

असं लिंक करा आधार-पॅन

  • आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.
  • तिथं आधार लिंकच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE  वर क्लिक करून माहिती द्या.
  • तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा. तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.
  • 'View Link Aadhaar Status' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल
  • याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.
  • UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.



हेही वाचा

हातावर पोट असणाऱ्यांना 'Parle G'चा आधार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा