Advertisement

बहिष्कारानंतरही 'या' चिनी कंपनीचा मोबाईल 'सोल्ड आऊट'

सोशल मीडियावर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रचार देखील केला जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट घडत असल्याचं दिसत आहे.

बहिष्कारानंतरही 'या' चिनी कंपनीचा मोबाईल 'सोल्ड आऊट'
SHARES

देशभरातील विविध स्तरावर भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर अशा आशयाचे आवाहन सोशल मीडियावर देखील केलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट घडत असल्याचं दिसत आहे.

काल भारतात चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला होता. भारतीय ग्राहकांचा अ‍ॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला शानदार प्रतिसाद मिळाला. हा सेल सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच हा फोन ‘सोल्ड आउट’ झाल्याचं समोर आलं आहे.

अ‍ॅमझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर काल वन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी खास सेल आयोजित करण्यात आला होता. सेलला ठरल्यानुसार दुपारी १२ वाजता सुरूवात झाली. पण हा फोन अ‍ॅमझॉनच्या वेबसाइटवर काही मिनिटांमध्येच सोल्ड आउट झाला.

सेलमध्ये OnePlus 8 Pro 5G खरेदी करणाऱ्यांसाठी काही ऑफरही होत्या. एसबीआयच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास ३००० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळत होते. याशिवाय जिओच्या ग्राहकांना ६००० रुपयांपर्यंतच्या जिओ बेनिफिट्सची ऑफर होती. तसंच ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला होता.

एकीकडे लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर देशातील देशभक्तांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. असं असलं तरी सेलमध्ये काही मिनिटांतच हा चिनी फोन विकला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.



हेही वाचा

भारतीय बाजारातून चिनी कंपन्या हद्दपार करणार, केंद्र सरकारचा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा