Advertisement

चीनला दिलेलं ५०० कोटीचं कंत्राट रेल्वेकडून रद्द?

भारत-चिन तणावाचा परिणाम चिनी कंपन्यांसोबत भारतीय रेल्वेशी संबंधित कंत्राटांवर झाल्याची चर्चा आहे.

चीनला दिलेलं ५०० कोटीचं कंत्राट रेल्वेकडून रद्द?
SHARES

लडाखमध्ये २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि चीन दरम्यानचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. याचाच परिणाम चिनी कंपन्यांसोबत भारतीय रेल्वेशी संबंधित कंत्राटांवर झाला आहे. चीन रेल्वे सिग्नल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कॉर्पोरेशनला (सीआरएससी) देशाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये रेल्वेची कामं देण्यात आली आहेत. त्यासंबंधितील करार रद्द करण्याला सहमती देण्यात आल्याचं बोललं जातंय.

२०१६ साली सीआरएससीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. या कंत्राटानुसार ही चिनी कंपनी ४०० किमी रेल्वे मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बसवणं आणि देखभाल करण्याचं काम करणार होती. सीआरएससी ही भारतीय रेल्वेच्या या महत्वकांशी प्रकल्पामध्ये एकमेव चिनी कंपनी होती. या प्रकल्पामाधील इतर सर्व कंपन्या या भारतीयच आहेत. त्याचबरोबर ५०० कोटींचे सीआरएससीला देण्यात आलेले हे कंत्राट होते. यामध्ये यंत्रणेची रचना करणारे, पुरवठा, बांधकाम, टेस्टींग यासारख्या गोष्टींचा समावेश होता. हे कंत्राट बहुलपूर-मुगलसराई रेल्वे मार्गासाठी देण्यात आले होते. पण हे कंत्राट आता रद्द करण्यात येणार आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफसीसीआयएल) या प्रकल्पाचे काम पाहत आहे. त्यांच्यानुसार, या चिनी कंपनीकडून या प्रकल्पावर होणारे कामही अत्यंत संथ गतीनं सुरु होतं. या कामावर अधिकारीही समाधानी नव्हते. त्याचबरोबर कामासंदर्भातही काही तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळेच कंपनीला या प्रकल्पामधून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्यासंबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाही.

द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी म्हटलं की, अधिकृत निर्णय होईपर्यंत आमच्या या अंतर्गत निर्णयाबद्दल मी अधिक माहिती देऊ शकत नाही. पण जिथं जिथं शक्य आहे तिथे भारतीय कंपन्यांबरोबर काम करण्याला आमचं प्राधान्य असेल, असं सांगितलं.



हेही वाचा

५०० चीनी उत्पादनांवर CAIT चा बहिष्कार, जाणून घ्या यादी

पंधरा दिवसांत पेट्रोल, डिझेल ७ रुपयांनी महागले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा