Advertisement

१५ दिवसांत पेट्रोल, डिझेल ७ रुपयांनी महागलं

गुरूवारी पेट्रोल-डिझेलची दरवाढ सलग बाराव्या दिवशीही कायम राहिली.

१५ दिवसांत पेट्रोल, डिझेल ७ रुपयांनी महागलं
SHARES
गुरूवारी पेट्रोल-डिझेलची दरवाढ सलग बाराव्या दिवशीही कायम राहिली. दिल्लीत पेट्रोल ७८ रुपये तर मुंबईत ८४ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचले आहे. तर डिझेलची किंमत प्रथमच ७६ रुपये प्रति लिटर झाली आहे. मागील १५ ते १६ दिवसांमध्ये  पेट्रोलच्या दरांत ल सात रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलचे दरही तेवढेच वाढलेले आहेत. 


राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर १ जूनपासून प्रतिलिटर दोन रुपयांच्या मूल्यवर्धित कराची आकारणी केली आहे. देशात ७ जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रोज वाढ होत आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाल्याने इंधनाचे दर रोजच वाढत आहेत. १५ ते १६ दिवसांतच पेट्रोलसह डिझेलच्या दरामध्ये तब्बल सात रुपयांची वाढ झाली.

लाॅकडाऊनच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळात इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. सरकारने लाॅकडाऊनमध्ये काही सवलती दिल्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. 

दरवाढ

7 जून
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55

8 जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11

9 जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65

10 जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07

11 जून
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62

12 जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17

13 जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71

14 जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31

15 जून
पेट्रोल 82.70
डिझेल 72.64

16 जून
पेट्रोल 83.17
डिझेल 73.2


हेही वाचा -  

मुंबई महापालिकेला मिळणार ८५ नव्या रुग्णवाहिका

Coronavirus Updates: उबर अॅपवरून बुक करा रुग्णवाहिका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा