चारकोपमध्ये सापडले एक हजाराच्या नोटांचे तुकडे

कांदिवली - मुंबईच्या चारकोप गाव इथं मोठ्या प्रमाणात एक हजाराच्या नोटांचे तुकडे सापडल्यानं खळबळ उडालीय.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चारकोप इथल्या नाल्यापासून ते रोडपर्यंत मोठ्या प्रमाणात जुन्या एक हजाराच्या नोटांंचे तुकडे पडलेले होते. त्यावेळी तिथं जमलेल्यांनी याची माहिती चारकोप पोलिसांना दिली. त्यानंतर नोटांचे तुकडे ताब्यात घेत हे पैसे कुणाचे आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

Loading Comments