Advertisement

जानेवारीपासून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या किंमतीत होणार वाढ

एलईडी टीव्ही, फ्रिज आणि वाॅशिंग मशीनसारखी गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जानेवारीपासून महागणार आहेत.

जानेवारीपासून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या किंमतीत होणार वाढ
SHARES

एलईडी टीव्ही, फ्रिज आणि वाॅशिंग मशीनसारखी गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जानेवारीपासून १० टक्क्यांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे. तांबे, अॅल्युमिनियम, स्टीलसारख्या धातूंपाठोपाठ कच्च्या मालाच्या दरांत वाढ झाल्यानं किमतीही वाढण्याची शक्यता आहे.

एलजी, पॅनासॉनिक व थॉमसनसारख्या उत्पादकांनी जानेवारीपासून उत्पादनांच्या दरांत वाढची घोषणा केलेली आहे. सोनी इंडियानं म्हटलं की, सध्या आम्ही स्थितीचा आढावा घेत आहोत.

पॅनासॉनिक इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ मनीष शर्मा म्हणाले की, ‘भविष्यात कमोडिटीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे उत्पादनांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे. जानेवारीपासून आमच्या उत्पादनांच्या किमती ६-७ टक्क्यांनी वाढणार आहेत. मार्चअखेरीपर्यंत त्यात १० ते ११ टक्क्यांची वाढ होऊ शकते.’

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया जानेवारीपासून ७-८% वाढ करणार आहे. कंपनीचे उपाध्यक्ष (होम अप्लायन्सेस) विजय बाबू म्हणाले, ‘आम्ही टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज आदी उत्पादनांच्या किमती ७-८% पर्यंत वाढवणार आहोत. तांबे, अॅल्युमिनियमसारखे धातू आणि कच्च्या मालाचे दर वेगाने वाढले आहेत. क्रूडही महागल्यानं प्लास्टिक सामग्रीवरील खर्चही वाढला आहे.’



हेही वाचा

मनसे- अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, ग्राहकांना दिला मराठीचा पर्याय

Night Curfew: मुंबईत रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली राहणार रेस्टॉरंट्स आणि बार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा