Advertisement

226 श्रीमंत फोर्ब्जच्या यादीतून बाहेर, अब्जाधीशांची संपत्ती घटली

काेराेनामुळे लागू केलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका जगातील अब्जाधीशनांही बसला आहे. गुरुवारी फाेर्ब्जने २०२० ची श्रीमंतांची यादी जाहीर केली.

226 श्रीमंत फोर्ब्जच्या यादीतून बाहेर, अब्जाधीशांची संपत्ती घटली
SHARES

काेराेनामुळे लागू केलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका जगातील अब्जाधीशनांही बसला आहे. गुरुवारी फाेर्ब्जने २०२० ची श्रीमंतांची यादी जाहीर केली. या यादीनुसार, १८ मार्चला या यादीला अंतिम स्वरूप देतेवेळी जगात २,०९५ अब्जाधीश हाेते. मात्र, त्यानंतर १२ दिवसांनी अगाेदर यादी तयार करतेवेळीच्या तुलनेत २२६ अब्जाधीश कमी झाले असल्याचे दिसून आले. याचा अर्थ १२ दिवसांमध्येच २२६ अब्जाधीशांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर घटली. त्यामुळे या २२६ अब्जाधीशांना फाेर्ब्जच्या यादीत स्थान मिळाले नाही.  त्यांना यादीतून काढता पाय घ्यावा लागला. या वेळी २,०९५ अब्जाधीशांपैकी ५१ टक्के (१,६०२) जणांची संपत्ती घटली अाहे. जगातील विद्यमान अब्जाधीशांची एकूण संपत्ती ८ ट्रिलियन डाॅलर अाहे. २०१९ च्या तुलनेत ती ७०० अब्ज डाॅलरने कमी अाहे.

 जेफ बेजोस : 113 अब्ज डॉलर

जेफ बेजोस जगातील श्रीमतांमध्ये पहिल्या स्थानावर आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये १८ अब्ज डाॅलरने घट झाली आहे. या वर्षी पत्नी मॅकेन्झीला घटस्फोट देण्यासाठी ३६ अब्ज डॉलर्स दिले. त्यामुळे ते यादीत २२ व्या स्थानी आहेत.

 बिल गेट्स :  98 अब्ज डॉलर

मायक्राेसाॅफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स दुसऱ्या स्थानी कायम अाहेत. परंतु त्यांची संपत्ती ९६.५ अब्ज डाॅलरने वाढून ९८ अब्ज डाॅलर झालेली अाहे.

 बर्नार्ड अर्नाल्ट : 76 अब्ज डॉलर

गतवर्षी चाैथ्या स्थानावरचे बर्नार्ड वाॅरेन बफेट एक पायरी वर सरकले अाहेत. संपत्ती ना वाढली ना घटली. ते पहिल्यांदाच एक पायरी वर गेले.

मुकेश अंबानी : 44.3 अब्ज डॉलर

िरलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी गतवर्षी ५० अब्ज डाॅलरसह १३ व्या स्थानावर हाेते. जिअाेमुळे यश मिळूनही काेराेनामुळे संपत्तीत ५.७ अब्ज डाॅलरची घट आल्याने ते यादीत 21 व्या स्थानावर गेले,..

 दमानी :  16.4 अब्ज डॉलर

डिमार्ट अायपीअाेनंतर दमानी देशाचे रिटेल किंग अाेळखले जातात. गेल्या वर्षी ११.१ अब्ज डाॅलरसह १२२ व्या स्थानी हाेते. श्रेणी व संपत्ती दाेन्हीत वाढ झाली अाहे.दमाणी यंदा यादीत 78 व्या स्थानावर आहेत.

शिव नाडर : 12.3 अब्ज डॉलर

भारतीय शिव नाडर गतवर्षी १४.६ अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह ८२ व्या स्थानावर हाेते. या वेळी संपत्ती घटून ते यादीत 103 क्रमांकावर गेले.



हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा