Advertisement

फोर्ब्सकडून जगातील १०० शक्तिशाली महिलांची यादी जाहीर, ४ भारतीयांचा समावेश

या यादीत एकूण ३० देशांतील महिलांचा समावेश आहे. यापैकी १० देशांच्या प्रमुख, ३८ सीईओ आणि ५ मनोरंजन क्षेत्राशी निगडीत महिलांचा समावेश आहे.

फोर्ब्सकडून जगातील १००  शक्तिशाली महिलांची यादी जाहीर, ४ भारतीयांचा समावेश
SHARES

जगातील १०० शक्तिशाली महिलांची यादी अमेरिकेतील प्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस, बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मुजूमदार- शॉ आणि एचसीएल एंटरप्राईजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडर-मल्होत्रा यांचा समावेश आहे. 

या यादीत एकूण ३० देशांतील महिलांचा समावेश आहे. यापैकी १० देशांच्या प्रमुख, ३८ सीईओ आणि ५ मनोरंजन क्षेत्राशी निगडीत महिलांचा समावेश आहे. यादीत निर्मला सीतारामन ४१ व्या स्थानावर, रोशनी नाडर-मल्होत्रा ५५ व्या स्थानावर तर किरण मुजुमदार शॉ ६८ व्या क्रमांकावर आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी ९८ व्या स्थानावर आहेत.

फोर्ब्सच्या या यादीत अॅजेंला मार्केल सलग १० व्या वर्षीही पहिल्या स्थानावर आहेत. बिल आणि मिलिंडा गेटस फाउंडेशनच्या सहअध्यक्षा मिलिंडा गेट्स (५ व्या स्थानावर), अमेरिकी हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (७ व्या स्थानावर), फेसबुकच्या मुख्य संचालन अधिकारी शेरिल सैंडबर्ग (२२ व्या स्थानावर), बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना (३९ व्या स्थानावर), ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ व्दितीय (४६ व्या स्थानावर), प्रसिद्ध पॉप सिंगर कलाकार रिहाना ( ६९ व्या स्थानावर) आणि बेयोन्से (७२ व्या स्थानावर) यांचा समावेश आहे.





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा