Advertisement

गोरख धंदा तेजीत


गोरख धंदा तेजीत
SHARES

मुंबई - पंतप्रधानांच्या निर्णयानंतर 500 आणि 1000 हजाराच्या नोटा खपवण्यासाठी पाच ते 25 टक्के कमिशन घेत असल्याचं निदर्शनात आलं आहे. सध्या नोटा बदली करण्यासाठी लाखाच्या मागे पाच ते 15 हजार कमिशन दिलं जात असल्याचंही उघड झालं आहे. मात्र अशा नोटा बाळगल्यास बँकांना यांची माहिती द्यावी लागणार आहे. अन्यथा सहा महिन्याची अटक होऊ शकते. कुठल्याही बँकेत अशा रितीने पैसे जमा केले तरीही आयकर विभागाचं यावर बारीक लक्ष असेल. तसेच बँकेकडून तुमच्या बँक व्यवहाराची पडताळणी होऊ शकते, असं सीए नाबिया मर्चंड यांनी सांगितलं.
काही अधिकारी, नेते, बिल्डर यांच्याकडे कोट्यावधी रक्कम घरातच पडून आहे. सामान्य खातेदारांच्या माध्यमातून तो काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सुजाण खातेदारांनी ती रक्कम स्वीकारू नये असं आवाहन मर्चंड यांनी केलं आहे. काळा पैसा योग्य तो कर भरून नियमित करता येणार आहे, असंही मर्चंड यांनी स्पष्ट केलं. तर काही जण या नोटा जाळून टाकतील, असाही अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा