Advertisement

रिलायन्स जिओमध्ये आणखी एका विदेशी कंपनीची गुंतवणूक

रिलायन्स जिओमध्ये मागील 4 आठवड्यांमध्ये 4 परदेशी कंपन्यांची गुंतवणूक केली आहे.

रिलायन्स जिओमध्ये आणखी एका विदेशी कंपनीची गुंतवणूक
SHARES

रिलायन्स जिओमध्ये मागील 4 आठवड्यांमध्ये 4 परदेशी कंपन्यांची गुंतवणूक केली आहे. फेसबुक, सिल्व्हर लेक, विस्टा इक्विटी यानंतर आता जनरल अटलँटिक ही न्यूयॉर्कमधील खाजगी इक्विटी फंड कंपनी जिओमध्ये 6,598.38 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. जनरल अटलांटिक जिओ प्लॅटफॉर्ममधील 1.34 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. 

4 आठवड्यांमध्ये रिलायन्स जिओमध्ये 4 मोठ्या गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली आहे. सर्वप्रथम फेसबुकनं  43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 9.99 टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं 5665.75 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील 1.15 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी करत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली.

 4 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जिओ प्लॅटफॉर्मधील गुंतवणूक 67,194.75 कोटींनी वाढली आहे. जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या चारही कंपन्या त्यांच्या सेक्टरमधील दिग्गज कंपन्या आहेत. या गुंतवणुकीमुळे जिओचे इक्विटी मूल्य 4.16 लाख कोटी तर एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी इतके झाले आहे.



हेही वाचा -

अवघ्या एका दिवसात 20 हजार जणांना मद्यविक्रीची घरपोच सेवा... 

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा