Advertisement

गो एअरचे 5 हजार कर्मचारी बिनपगारी रजेवर

विमान कंपनी गोएअरने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5 हजार 3 मे पर्यंत बिनपगारी रजेवर पाठवलं आहे.

गो एअरचे 5 हजार कर्मचारी बिनपगारी रजेवर
SHARES

विमान कंपनी गोएअरने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5 हजार 3 मे पर्यंत बिनपगारी रजेवर पाठवलं आहे. देशभरात असलेल्या लाॅकडाऊनमुळे विमान सेवा खंडीत आहे. याचा मोठा आर्थिक फटका सर्वच विमान कंपन्यांना बसला आहे. गोएअरलाही मोठं नुकसान सोसावं लागत आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. 25 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत असणार आहे. वाडिया ग्रृपची मालकी असणाऱ्या गोएअरने लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर टप्प्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवलं आणि पगारामध्ये कपात देखील केली आहे. कंपनीचे एकूण 5500 कर्मचारी आहेत.

गोएअरच्या मॅनेजमेंटने कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे कळवलं आहे की, लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. परिणामी विमान उड्डाण देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही 3 मेपर्यंत बिनपगारी रजेवर जावे. गोएअरमधील  5500 कर्मचाऱ्यांंपैकी 10 टक्के कर्मचारीच कार्यरत राहणार आहे. हे ते कर्मचारी आहेत, ज्यांची सेवा अत्यावश्यक आहे. 4 मे पासून सर्व सेवा सुरू होतील अशी आशा गोएअरला आहे, जेणेकरून त्यांची बिघडलेली घडी बसली जाईल.



हेही वाचा -

पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२०० वर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा