Advertisement

सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी, मुंबईत आहे 'इतकी' किंमत

मुंबई रिटेल मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या किंमतीत चांगलीच वाढ पाहायला मिळाली.

सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी, मुंबईत आहे 'इतकी' किंमत
SHARES

सोन्याच्या किंमती रोज नवे रेकॉर्ड रचत आहेत. देशामध्ये सोन्याचे भाव पहिल्यांदा ५० हजारांच्या वर गेले आहेत. जगभरात सोन्याची वाढलेली मागणी आणि रुपया घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये ही वाढ झाली आहे. भविष्यात सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई रिटेल मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या किंमतीत चांगलीच वाढ पाहायला मिळाली. मुंबईमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजार १२० रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचे भाव ५० हजार ०५० रुपये प्रति तोळा झाले आहेत.

देशामध्ये विविध राज्यांमध्ये सोन्याच्या वेगवेगळ्या किमती पाहायला मिळतात. याचं कारण म्हणजे या किंमती एक्साइज ड्यूट, स्टेट टॅक्स आणि मेकिंग चार्जेस नुसार ठरवल्या जातात. परिणामी प्रत्येक राज्यात काहीशा फरकानं वेगवेगळ्या किंमती असू शकतात. मात्र गुरुवारी देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्यानं ५० हजारांचा दर पार केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव १ हजार ७८८ प्रति औंसवर ट्रेंड करत आहेत. तर चांदीचे भाव १८.३५ डॉलर प्रति औंस आहेत. अमेरिकेत देखील सोन्याचे भाव ८ वर्षातील उच्चतम स्तरावर आहेत. शेअर मार्केटमध्ये होणारी घसरण, लॉकडाऊनमुळे विविध व्यवसायामध्ये सुरू असणारी हालाखिची परस्थिती त्याचप्रमाणे जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी व्याजदर घटवल्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे.



हेही वाचा

युनियन बँक सुरू करणार १२५ प्रादेशिक कार्यालय

लाॅकडाऊनमुळे ७८ टक्के सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग ठप्प

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा