Advertisement

रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार

३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असून या दिवशी रविवारची सुट्टी आली आहे. त्यामुळंच सरकारी बँकाच्या शाखा खुल्या ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आले आहेत.

रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार
SHARES

रविवारी ३१ मार्च रोजी सर्व सरकारी बँकांच्या शाखा खुल्या राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली. रिझर्व्ह बँकेनं यासंबंधी सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असून या दिवशी रविवारची सुट्टी आली आहे. त्यामुळंच सरकारी बँकाच्या शाखा खुल्या ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आले आहेत. 


सर्क्युलर जारी

रिझर्व्ह बँकेने यासंबंधी एक सर्क्युलर जरी केलं आहे. केंद्र सरकारचे सर्व पे एंड अकाउंट कार्यालय ३१ मार्च रोजी खुले राहणार आहे. याच धर्तीवर सरकारी बँका ३१ मार्च रोजी खुल्या ठेवण्यात याव्यात, असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.


काय असेल वेळ

सरकारी बँकांच्या सर्व शाखा ३० मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत तर ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. तसंच आरटीजीएस आणि एनईएफटीसहित सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार ३० आणि ३१ तारखेला वाढीव वेळेपर्यंत सुरू राहणार आहेत.



हेही वाचा -

माझे पैसे घेऊन जेटला वाचवा - विजय माल्या




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा