Advertisement

मार्च महिन्यात विक्रमी जीएसटी कलेक्शन, तब्बल मिळाला 'इतका' महसूल

कोरोना लाॅकडाऊनंतर देशाची अर्थव्यवस्था आता सुधारत असल्याचं दिसून येत आहे. मार्चमध्ये वस्तु आणि सेवा करापासून (जीएसटी) विक्रमी महसूल मिळाला आहे.

मार्च महिन्यात विक्रमी जीएसटी कलेक्शन, तब्बल मिळाला 'इतका' महसूल
SHARES

कोरोना लाॅकडाऊनंतर देशाची अर्थव्यवस्था आता सुधारत असल्याचं दिसून येत आहे. मार्चमध्ये वस्तू आणि सेवा करापासून (जीएसटी) विक्रमी महसूल मिळाला आहे.  मार्च महिन्यात १ लाख २३ हजार ९०२ कोटींचा जीएसटी वसूल झाला आहे. मार्च २०२० मध्ये हा आकडा ९७ हजार ५९० कोटी रुपये होते. 

 केंद्र सरकारने आज जीएसटी कर संकलनाचे मार्च महिन्यातील आकडेवारी जाहीर केली. वस्तूच्या आयातीतून मिळणाऱ्या जीएसटीमध्ये ७० टक्के तर देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल १७ टक्के वाढला आहे.

गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत कर महसुलात २७ टक्के वाढ झाली आहे. तर जानेवारी ते मार्च या तिमाहीतील कर महसूल १४ टक्क्यांनी वाढला आहे.

मागील सहा महिन्यांपासून जीएसटी कलेक्शन १ लाख कोटींच्या वर राहिले आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसटीमधून तब्बल १ लाख १३ हजार १४३ कोटी मिळाले आहेत. जीएसटी महसुलाने सलग सहाव्या महिन्यात एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. सलग तिसऱ्यांदा दरमहा जीएसटी कर महसूल १.१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

आकडेवारीनुसार, सरकारला केंद्राच्या जीएसटीतून २२,९७३ कोटी रुपये, राज्याच्या जीएसटीतून २९,३२९ कोटी रुपये आणि एकीकृत जीएसटीतून ६२,८४२ कोटी रुपये मिळाले. त्याचबरोबर उपकर ८ हजार ७५७ कोटी इतका आहे. यात ९३५ कोटी रुपये वस्तु आयातीवर मिळालेल्या कराचे आहेत.

६ महिन्यांचं जीएसटी कलेक्शन

मार्च २०२१           १,२३,९०२ कोटी रुपये

फेब्रुवारी २०२१        १,१३,१४३

जानेवारी २०२१         १,१९,८४७

डिसेंबर २०२०          १,१५,१७४

नोव्हेंबर २०२०            १,०४,९६३

ऑक्टोबर २०२०        १,०५,१५५




हेही वाचा -

  1. ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला

  1. दिलासादायक! आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा