Advertisement

Good News! तिकीट झाले स्वस्त, सिनेप्रेमींना नववर्षाची भेट

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिनेमाच्या तिकीटांसोबतच ३२ इंचापर्यंतचे टीव्ही आणि मॅानिटर स्क्रीन्ससह २३ वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

Good News! तिकीट झाले स्वस्त, सिनेप्रेमींना नववर्षाची भेट
SHARES

केंद्र सरकारने घटवलेल्या जीएसटीच्या दरांनुसार १ जानेवारीपासून सिनेमाचं तिकीट स्वस्त झालं आहे. कुटुंबकबिल्यासह सिनेमा बघण्यासाठी जाणाऱ्या सिनेप्रेमींसाठी ही मोठी खूशखबर आहे. आतापर्यंत तिकीटांच्या दरांवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. १ जानेवारीपासून मात्र तिकीटांच्या दरांवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.


मनोरंजन झालं स्वस्त

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिनेमाच्या तिकीटांसोबतच ३२ इंचापर्यंतचे टीव्ही आणि मॅानिटर स्क्रीन्ससह २३ वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.


या वस्तूंचा समावेश

२२ डिसेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत २३ वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात सिनेमा तिकीट, टेलिव्हिजन, मॅानिटर स्क्रीन्स, पॅावर बँक, डबाबंद भाज्या इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. यामुळे १ जानेवारीपासून या सर्व वस्तूंचे दर कमी झाले आहेत.

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं सिनेमाप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मिळालेली ही आनंदाची बातमी २०१९ हे संपूर्ण वर्ष चित्रपटसृष्टीसाठी शुभशकून ठरणारी असल्याचंही म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

Video- 'या' कारणामुळे कादर खान काॅमेडीकडे वळले, ते अखेरपर्यंत... बघा ५ बेस्ट काॅमेडी सीन

दुर्दैवी, अफवा खरी ठरली! ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा