Advertisement

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण ३१ जुलैपर्यंत बंद

एअर बबल अंतर्गत काही देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. याबाबत भारताने अमेरिका, ब्रिटन, यूएई, भूतान आणि फ्रान्ससह २४ देशांसोबत करार केला आहे.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण ३१ जुलैपर्यंत बंद
SHARES

आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील बंदी ३१ जुलैपर्यंत सरकारने वाढवली आहे. कोरोनाचा धोका कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) काढलेल्या पत्रकात या निर्णयाची माहिती दिली.

दरम्यान, या काळात काही ठराविक मार्गांवरील आणि वंदे भारत मिशनमधील विमान उड्डाणे सुरू राहतील, असं डीजीसीएने म्हटलं आहे. एअर बबल अंतर्गत काही देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. याबाबत भारताने अमेरिका, ब्रिटन, यूएई, भूतान आणि फ्रान्ससह २४ देशांसोबत करार केला आहे. त्यानुसार या देशांमधील काही शहरांदरम्यान थेट आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहे. मात्र सर्वसामान्य आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर असलेली बंदी ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूक व कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. तसंच 31 जुलैनंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत तेव्हाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्याही देशासोबतच्या मालवाहतूक व कुरिअर सेवेवर बंदी घालण्यात आलेली नाही, सुरक्षा नियम व कोविड नियमांचे पालन करत ही वाहतूक सुरू असल्याची माहितीही परिपत्रकात देण्यात आली आहे.हेही वाचा -

दिलासादायक! घरोघरी लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा