Advertisement

आयटीआर-१ फाॅर्म ई-फायलींगसाठी तयार

गेल्यावर्षी आयटीआर-१ 'सहज' हा फाॅर्म देशभरातील ३ कोटींहून अधिक नोकरदारांनी भरला होता. वार्षिक ५० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला हा फाॅर्म भरता येऊ शकतो. ३१ जुलैपर्यंत करदात्यांना हा फाॅर्म भरता येईल.

आयटीआर-१ फाॅर्म ई-फायलींगसाठी तयार
SHARES

नव्याने बनवण्यात आलेला आयटीआर-१ फाॅर्म प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलींग पोर्टलवर अधिकृतरित्या टाकण्यात आला आहे. या फाॅर्मचा वापर प्रामुख्याने नोकरदार वर्गाकडून केला जाताे.


पोर्टलवर उपलब्ध

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा (सीबीडीटी) ने ५ एप्रिल रोजी नवीन आयटीआर-१ फाॅर्म नोटीफाय केला होता. हा फाॅर्म करदात्यांना https:// www.incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उर्वरीत फाॅर्मही लवकरच या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


कुठला तपशील द्यावा लागेल?

हा फाॅर्म भरताना त्यात नोकरदारांना २०१८-१९ आर्थिक वर्षासाठी सॅलरी ब्रेकअप द्यावा लागणार आहे. यांत मूळ वेतन, वेगवेगळे भत्ते, अतिरिक्त सुविधा त्याचप्रमाणे सेक्शन १६ अंतर्गत सवलतीसाठी दावा केलेल्या खर्चाचा तपशील यांचा समावेश आहे. तर व्यावसायिकांना जीएसटी क्रमांक तसंच वार्षिक उलाढालीचा तपशील द्यावा लागेल. काही अपवाद वगळता सर्व ७ प्रकारचे आयटीआर फाॅर्म आॅनलाईन भरावे लागतील.


शेवटची तारीख कुठली?

गेल्यावर्षी आयटीआर-१ 'सहज' हा फाॅर्म देशभरातील ३ कोटींहून अधिक नोकरदारांनी भरला होता. वार्षिक ५० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला हा फाॅर्म भरता येऊ शकतो. ३१ जुलैपर्यंत करदात्यांना हा फाॅर्म भरता येईल.



हेही वाचा-

महागाई वाढू नये म्हणून व्याजदर स्थिर

गुड न्यूज! कार, बाईकचा इन्श्युरन्स स्वस्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा