Advertisement

लक्ष्मी विलास बँकेचं 'या' बँकेत होणार विलीनीकरण

रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने तयार केला आहे.

लक्ष्मी विलास बँकेचं 'या' बँकेत होणार विलीनीकरण
SHARES
अनियमिततेने आर्थिक संकटात सापडल्या लक्ष्मी विलास बँकेवर मंगळवारी ३० दिवसांसाठी निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने तयार केला आहे.लक्ष्मी विलास बँकेला डीबीएस बँक इंडिया या कंपनीत विलीन करण्यात येणार आहे. मूळचा सिंगापूरचा समूह असलेल्या डीबीएसने यासाठी २५०० कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकारणामुळे डीबीएस समुहाला भारतात बँकिंग परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील महिनाभरात विलीणीकरण योजनेची अमलबजावणी केली जाईल, असं आरबीआयने म्हटलं आहे. बँकेवरील कारवाईने खातेदारांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेने केलं आहे.कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी फक्त २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. बँकेच्या बुडीत कर्ज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. 

हेही वाचा -

बीपीसीएलसाठी खरेदीदार मिळेना, बोलीतून बड्या कंपन्यांची माघार

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा