Advertisement

सुटीच्या दिवशीही आता कापला जाणार ईएमआय

रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुद्धा आता बँकिंग व्यवहार होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस सिस्टिम आठवड्यातील ७ दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सुटीच्या दिवशीही आता कापला जाणार ईएमआय
SHARES

बँकिंग आणि अर्थविषयक नियमांमध्ये १ ऑगस्टपासून काही महत्वाचे बदल झाले आहेत. ईएमआय, एटीएम, घरगुती गॅस, रोख रकमेचे व्यवहार आदी संबंधित हे बदल आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुद्धा आता बँकिंग व्यवहार होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस  सिस्टिम आठवड्यातील ७ दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे पगार आणि पेन्शन रविवारी, बँक हॉलिडे आणि इतर सुटीच्या दिवसांमध्येही जमा केले जाणार आहेत. तसंच सुटीच्या दिवशी कर्जाचा ईएमआय कापला जाणार आहे.

याशिवाय आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढणे, जमा करणे आणि चेक बुकसह इतर शुल्कामध्ये बदल होणार आहे. या बँकेच्या ग्राहकांना आता बँकेच्या शाखेत चेकच्या माध्यमातून केवळ ४ वेळा व्यवहार करता येतील. हे व्यवहार मोफत असतील. यानंतर पैसे काढणे किंवा जमा करण्यासाठी प्रत्येकवेळा १५० रुपये अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे.

१ ऑगस्टपासून एटीएमद्वारे तुम्ही ६ महानगरांमध्ये महिन्यातून ३ वेळा मोफत व्यवहार करू शकता. याशिवाय इतर शहरांमध्ये ५ व्यवहार मोफत आहेत. यावर व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल. शुल्क म्हणून तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर मेट्रो शहरांमध्ये २० रुपये आणि इतर शहरांमध्ये ८.५० रुपये भरावे लागतील.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी फी भरावी लागेल. आता प्रत्येक वेळी डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी २० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. आतापर्यंत डोअर स्टेप बँकिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.

ग्राहकाला मनी ट्रान्सफर आणि मोबाईल पेमेंट इत्यादीसाठी २० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. आयपीपीबी खाते किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ग्राहक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी समान शुल्क भरावे लागेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा