Advertisement

कॅटची महाराष्ट्र राज्यस्तरीय परिषद १० जानेवारीला

देशात सुमारे ७ कोटी व्यापारी आणि ४० हजाराहून अधिक व्यापारी व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कॅट) चे महाराष्ट्रव्यापी एक दिवसीय परिषद रविवार, १० जानेवारीला पुणे इथं होणार आहे.

कॅटची महाराष्ट्र राज्यस्तरीय परिषद १० जानेवारीला
SHARES

देशात सुमारे ७ कोटी व्यापारी आणि ४० हजाराहून अधिक व्यापारी व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कॅट) चे महाराष्ट्रव्यापी एक दिवसीय परिषद रविवार, १० जानेवारीला पुणे इथं होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेअर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी दिली. 

यासंदर्भात बोलताना सुरेशभाई ठक्कर म्हणाले व्यापारी, व्यावसायिक यांना दैनंदिन व्यवसायात भेडसावणाऱ्या अडचणी, बाजारात उठाव मिळण्यासाठी पारंपरिक व्यवसायात करावयाचे बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. याशिवाय ऑन लाईन व्यापार, केंद्र, राज्य सरकारच्या जाचक अटी, कायदे, एफएसएसआय, जीएसटी, टीएमसीमुळे उदभवणाऱ्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया, संस्थापक चेअरमन महेंद्रभाई शहा, सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांच्यासह महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कुंभूजकर  ,राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी महेशभाई बखाई, महाराष्ट्र संयुक्त म॔त्री सचिनभाऊ निवंगुणे, फेडरेशन ऑफ असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा, महाराष्ट्र मर्चंटस फेडरेशनचे वालचंद संचेती, जितोचे राष्ट्रीय व्हाईस चेअरमन विजय भंडारी, जितो महाराष्ट्राचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल,पुना  मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

पुण्यातील जयजीनेंद्र प्रतिष्ठान, नाजूश्री सभागृह, गंगाधाम मार्केट यार्ड जवळ होणाऱ्या या परिषदेत राज्यातील ३६ जिल्ह्यातील व्यापारी संघटना, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

(maharashtra CAT meeting held at pune on 10th january 2021)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा