सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाला विरोध

 Mumbai
सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाला विरोध

सीएसटी - स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ बीकानेर, जयपूर आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँकांचे येत्या १ एप्रिल रोजी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. या पाच बँकाचा ७० ते १०० वर्षांचा जुना इतिहास आहे. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाला महाकाय बनवण्याच्या प्रक्रियेत या सहयोगी बँका स्वतःचे अस्तिव गमावून बसणार आहेत. भारतातल्या विविध उच्च न्यायालयात याप्रकरणी अनेक जनहित याचिका अजुन अनिर्णित अवस्थेत आहेत. जनतेची कुठलीही चौकशी न करता सरकारने बँकेचे विलिनिकरण लादले आहे. याला ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉइज असोसिएशनने विरोध दर्शवला असल्याची माहिती फेडरेशनचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी मुंबई पत्रकार संघ येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

बँकेचे विलिनीकरण होत असताना स्टेट बँकेने मोठ्या प्रमाणात शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला जनतेचा विरोध असून १ एप्रिलपासून जो अतिरिक्त पैसा आकारण्यात येणार आहे त्याला विरोध असल्याचे देखील व्यंकटचलम यांनी म्हटले.

Loading Comments