Advertisement

महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कोणता?


महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कोणता?
SHARES

पितांबरी, वामनहरी पेठे यांसारख्या अनेक कंपन्यांच्या जाहिराती आपण विविध माध्यमातून पहात असतो किंवा ऐकतही असतो. आजही वामन हरी पेठेंच्या दागिन्यांना ग्राहक पंसतीही देतात. मात्र या सगळ्या उत्पादक कंपन्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर वन ब्रँड कोणता? हे आता ठरवले जाणार आहे आणि तेही तुमच्या पसंतीने. अर्थसंकेत या वृत्तपत्राने 'महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड' या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी 23 मे रोजी संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात केले आहे. या आधी तुम्हाला ऑनलाईन व्होटिंग करून तुमचा आवडता ब्रँड निवडायचा आहे. ही स्पर्धा एकूण 13 ब्रँडमध्ये असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते सोमवारी 8 मे रोजी मतदान करून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

'अर्थ संकेत' हा आमचा बिझनेससंदर्भात मराठी न्यूज पेपर आहे. अर्थसंकेतच्या 'महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड' या स्पर्धेद्वारे वेबसाईटवर 13 मराठी प्रसिद्ध उद्योजकांची लोकप्रियता मतदानाच्या माध्यमातून तपासली जाणार आहे. मराठी व्यावसायिकांमध्ये ब्रँडिंग विषयी जनजागृती व्हावी यासाठी ही संकल्पना आहे.

रचना बागवे, संस्थापिका, अर्थसंकेत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा