Advertisement

उद्योजकांचा प्रेरणास्त्रोत 'मराठी बिझिनेस एक्स्चेंज' चर्चासत्राचं ठाण्यात आयोजन


उद्योजकांचा प्रेरणास्त्रोत 'मराठी बिझिनेस एक्स्चेंज' चर्चासत्राचं ठाण्यात आयोजन
SHARES

मराठी उद्योजकांना चालना मिळवून देण्यासाठी 'मराठी बिझिनेस एक्स्चेंज' या चर्चासत्राचं ठाण्यात आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यातील 'हॉटेल टीप टॉप प्लाझा' येथे ९ आणि १० नोव्हेंबर रोजी हे चर्चासत्र होणार आहे.


असं होईल उद्घाटन

९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या चर्चासत्राचं उद्घाटन करण्यात येईल. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, प्रसिद्ध मसाला उद्योजक डॉ. धनंजय दातार उपस्थित राहतील.




सकाळी ११.३० ते संध्याकाळी ४.४५ पर्यंत चर्चासत्र

  • सकाळी ११.३० या वेळेत 'ब्रँडिंग युव्हर बिझिनेस' या विषयावरील चर्चासत्रात अॅडर्व्हटायझिंग गुरू भरत दाभोळकर मार्गदर्शन करतील.
  • दुपारी २ ते ३.३० या वेळेत 'स्केलिंग बिझनेस सेल अॅण्ड मार्केटिंग' या विषयावरील चर्चासत्रात सॅमसोनाईटचे संचालक (बिझनेस डेव्हलपमेंट) नरेंद्र प्रताप सिंग आणि ऊर्जा एनर्जी प्रा. लि आणि ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक पराग शुकाल मार्गदर्शन करतील.
    दुपारी ३.३० ते ४.१५ वाजेदरम्यान 'स्टेपिंग इन टू प्रॉस्पेरिटी' या विषयी वास्तू आणि फेंगशुईचे सल्लागार एस. बी.एस सुरेंद्रन मार्गदर्शन करतील.
  • दुपारी ४.१५ ते संध्याकाळी ५.४५ वाजेदरम्यान 'सोर्सिंग फायनान्स अँड फंडिंग फॉर बिझिनेस' या विषयावर नेक्स्ट लेव्हल एज्युकेशन प्रा. लि. च्या अध्यक्षा आणि सहसंस्थापक अल्पा शाह आणि फिन्टेक कंपनी रुबिकचे व्यवस्थापकीय संचालक सुमेरू शाह मार्गदर्शन करतील.




१० नोव्हेंबर रोजीचं चर्चासत्र

  • गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत 'स्टार्टअप इनसाइट' या विषयावर रिलायन्स जियोचे लॉजिस्टिक प्रमुख संजय शर्मा आणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष नितिन पोद्दार मार्गदर्शन करतील.
  • सकाळी ११ ते ११.३० वाजेदरम्यान 'आर्ट ऑफ क्रिएशन' या विषयावर नेक्स्ट लेव्हल एज्युकेशन प्रा. लि. च्या अध्यक्षा आणि सहसंस्थापक अल्पा शाह मार्गदर्शन करतील.
  • सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान 'व्हेन्च्युरिंग इन टू ब्युटी अँड वेलनेस इंडस्ट्री' या विषयावर तळवळकर बेटर व्हॅल्यू फिटनेस लि. चे सीईओ मधुकर तळवळकर, जेसीकेआरसी, 'स्पा'च्या रेखा चौधरी आणि डॉ. त्वचाचे संस्थापक डॉ. अमित कारखानीस मार्गदर्शन करतील.
  • दुपारी १.३० ते २.३० या वेळेत 'अपेरल अँड क्लोथिंग इंडस्ट्री' या विषयावर आदित्य बिर्ला रिटेलचे महाव्यवस्थापक (मनुष्यबळ व्यवस्थापन) सुनिल त्रिपाठी आणि मिंत्रा डॉट कॉमचे व्यवस्थापक संदीप कदम मार्गदर्शन करतील.
  • दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत 'सोलर इंडस्ट्री' या विषयावर सौर इंजिनीअर अँड कन्सल्टंट प्रा. लि. चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आशुतोष ठाकूर मार्गदर्शन करतील.
  • दुपारी ३.१५ ते ४.४५ या वेळेत 'ट्रेन्ड्स इन द फूड अँड ब्रिव्हरेज सेक्टर' या विषयावर गोवा पोर्तुगीजचे मालक डॉ. सुहास अवचट आणि सेलिब्रिटी शेफ तुशार देशमुख मार्गदर्शन करतील.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा