Advertisement

मारुतीने ६३ हजार कार परत मागवल्या, 'हे' आहे कारण

मारुती सुझुकी इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करत जवळपास ६३ हजार कार परत मागवल्या आहेत.

मारुतीने ६३ हजार कार परत मागवल्या, 'हे' आहे कारण
SHARES

मारुती सुझुकी इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करत जवळपास ६३ हजार कार परत मागवल्या आहेत.  यामध्ये सियाझच्या काही पेट्रोल स्मार्ट हायब्रिड, अर्टिगा आणि एक्सएल या कारचा समावेश आहे. कंपनीने १ जानेवारी २०१९ ते २१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत तयार केलेल्या कार परत मागवल्या आहेत. 

६३ हजार ४९३ कारमधील मोटर व्हेईकल जनरेशन यूनिट (MGU) मधील कमतरतेची तपासणी करण्यासाठी या कार परत मागवल्या आहेत. उत्पादन करतेवेळी एमजीयूमध्ये कमतरता राहिली आहे. या कारमधील कोणताही पार्ट या काळात कंपनी मोफत बदलून देणार आहे. ग्राहकांकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. ६ डिसेंबरपासून कंपनीने  या कार परत मागवण्यास सुरूवात केली आहे. 

आपली कार दुरूस्तीसाठी कंपनीने मागवली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांना मारुती सुझुकीच्या  marutisuzuki.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईट आपल्या कारचा १४ अंकी चेसीज नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर आपली कार परत मागवली आहे की नाही हे समजू शकेल. 



हेही वाचा  -

बँकांच्या ATM कार्ड वापरण्याच्या नियमात बदल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा