• अखेर दोन हजाराची नोट हाती लागली
SHARE

बोरिवली - सकाळपासून लाइनीमध्ये उभं राहिल्यावर अखेर दोन हजाराची नोट हाती लागली. दोन हजारची नवी कोरी नोट हातात आल्यावर नागरिकांचा झालेला आनंद गगनात मावेनासा होता. बुधवारी बँका आणि एटीएम बंद. नेहमी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा खिशात ठेवणाऱ्या मुंबईकरांकडे सुट्ट्या पैशांचा तुटवडा. करणार काय ? प्रत्येकाचेच झाले होते वांदे. म्हणूनच गुरुवारी बँका सुरू होताच तुंबळ गर्दी झाली.

पण खरं तर घाई करायची गरज नाहीये. सगळ्यांनाच पैसे बदलून मिळणार आहेत. कुणीही पॅनिक होऊ नका, असं आवाहन बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या