SHARE

मुंबई - मुंबईतले पेट्रोल पंप 12 नोव्हेंबरच्या रात्रीपासून १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बंद राहणारायेत. पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशननं घेतलाय.

केंद्र सरकारनं मंगळवारी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांची मोठी पंचाईत झाली. केंद्र सरकारने पेट्रोल पंप, रुग्णालयं, औषध दुकानं आणि रेल्वे स्टेशनवर या नोटा स्वीकारण्याच्या सुचना दिल्या. मात्र काही ठिकाणी पेट्रोल पंपावर वादाचे प्रसंग घडू लागले. रविवारी पहाटे म्हणजेच 13 नोव्हेंबरला पाचनंतर पेट्रोल पंप पुन्हा सुरू होणारायेत. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं पेट्रोल डिझेल असोसिएशननं स्पष्ट केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या