पैसे न मिळाल्यानं नागरीक नाराज

 Goregaon
पैसे न मिळाल्यानं नागरीक नाराज
पैसे न मिळाल्यानं नागरीक नाराज
See all

गोरेगाव - एस.आर.पी.एफ पोस्ट ऑफिसमध्ये सकाळपासून गर्दी झाली होती. मात्र नागरिकांना पैसे बदलून न मिळाल्यानं परत जावं लागलं. पोस्टात सेविंग खाते असणाऱ्यांना पैसे बदलून दिले जाणार होते. मात्र अजून पोस्टात पैसे न आल्यामुळे नागरिक परत जातायेत. ज्या खातेधारकांना आरडी, सुकन्या योजना यामध्ये पैसे भरायचे आहेत त्यानी १०० रुपयाच्या नोटा घेऊन यावं, असे आदेश पोस्टाकडून देण्यात आलेत. तसंच मालाड पश्चिमेकडील पोस्ट कार्यालयात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे फलक लावण्यात आलेत. त्यामुळे पोस्टात येण्याऱ्या नागरिकांना परत जावं लागतंय. पोस्ट कार्यालयातून नवीन नोटा आल्या नाहीत. मग आम्ही तरी पैसे कुठून देणार असं स्पष्टीकरण पोस्टाकडून देण्यात येतंय.

Loading Comments