Advertisement

सेन्सेक्सने नोंदवला विक्रमी उच्चांक; ३६ हजार ९८५ वर बंद

गुरूवारी सेन्सेक्स प्रथमच ३७ हजार अंशांची पातळी ओलांडत ३७ हजार ६१ वर पोहोचला होता. निफ्टीनेही मागील विक्रम मोडत ११ हजार १८५ अंशांची उच्चांकी पातळी गाठली

सेन्सेक्सने नोंदवला विक्रमी उच्चांक; ३६ हजार ९८५ वर बंद
SHARES

जागतिक बाजारांकडून मिळालेले सकारात्मक संकेत अाणि जून तिमाहीमध्ये कंपन्यांचे चांगले निकाल यामुळे देशातील शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स १२६ अंकाने वधारून ३६ हजार ९८५ वर बंद झाला. सेन्सेक्सचा हा अातापर्यंतचा उच्चांक अाहे. तर दिवसभरात सेन्सेक्सने ३७ हजारांची विक्रमी पातळीही ओलांडली. निफ्टीही दिवसाअखेर ३५ अंकांची वाढ नोंदवत ११ हजार १६७ वर स्थिरावला.


सेन्सेक्स प्रथमच ३७ हजारांवर 

बँकांच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या खरेदीने बाजाराला सपोर्ट मिळाला. तर अायटी, वाहन अाणि धातू कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरण दिसून अाली. गुरूवारी सेन्सेक्स प्रथमच ३७ हजार अंशांची पातळी ओलांडत ३७ हजार ६१ वर पोहोचला होता. निफ्टीनेही मागील विक्रम मोडत ११ हजार १८५ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. गुरूवारी मिडकॅप अाणि स्माॅलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून अाली. बीएसईमधील १३४९ शेअर्समध्ये तेजी राहिली. तर एसबीआय, आयसीआयसीआय बँक, पाॅवरग्रिड, ओएनजीसी, एनटीपीसी, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, एचयूएल, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स अाणि आईटीसी या कंपन्यांचे शेअर्स वधारले.


बाजारमूल्य १५० लाख कोटी 

सलग ४ दिवस सेन्सेक्स विक्रम नोंदवत अाहे. बाजारातील या तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) बाजार भागभांडवल अाता १५० लाख कोटी रुपयांच्या वर गेलं अाहे. गुरूवारी बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य १,५०,२०, ७०४ कोटी रुपयं झालं अाहे. ४ दिवसात बीएसईचं बाजारमूल्य ३ लाख ४३ हजार ६७६ कोटी रुपयांनी वाढलं अाहे.

सेन्सेक्सची विक्रमी वाटचाल 

२६ जुलै  - ३७,०६१.६२ चा विक्रमी उच्चांक
२५ जुलै  - ३६,९४७.१८ चा उच्चांक
२४ जुलै  - ३६,९०२.०६ च्या पातळीवर
२३ जुलै  - ३६,७४९.६९ या विक्रमी पातळीवर



हेही वाचा - 

मास्टर-ब्लास्टरचं एमआयजी काॅलनीत सेकंड होम

२७ जुलैपासून फ्रीज, टीव्ही, वाॅशिंग मशीन होणार स्वस्त




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा