Advertisement

२७ जुलैपासून फ्रीज, टीव्ही, वाॅशिंग मशीन होणार स्वस्त

फ्रीज, २७ इंची टीव्ही, वॅक्यूम क्लीनर, वाॅशिंग मशीन अादी वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के झाल्याने या वस्तू स्वस्त होणार अाहेत.

२७ जुलैपासून फ्रीज, टीव्ही, वाॅशिंग मशीन होणार स्वस्त
SHARES

जीएसटी परिषदेने अनेक घरगुती वस्तूंवरील वस्तू अाणि सेवा कर (जीएसटी) १० टक्क्यांनी कमी केला अाहे. फ्रीज, २७ इंची टीव्ही, वॅक्यूम क्लीनर, वाॅशिंग मशीन अादी वस्तूंवरील जीएसटी अाता २८ टक्क्यांवरून १८ टक्के झाला अाहे. कर कमी झाल्याने या वस्तू २७ जुलैपासून स्वस्त होणार अाहेत. ग्राहकांना १ हजार ते २० हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल, असं या वस्तूंच्या उत्पादक कंपन्यांनी म्हटलं अाहे.

१५ वस्तू स्वस्त 

शनिवारी जीएसटी परिषदेने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केला अाहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार अाहेत. फ्रीज, २७ इंची टीव्ही, वॅक्यूम क्लीनर, वाॅशिग मशीन या वस्तूंचे भाव थेट १० टक्के कमी होणार असल्याचे रिटेल स्टोअर विजय सेल्सचे एमडी निलेश गुप्ता यांनी म्हटलं अाहे. १५ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात अाला अाहे. सणासुदीच्या दिवसांच्या अगोदर ग्राहकोपयोगी वस्तूंचे दर कमी झाल्याने मध्यमवर्गियांना मोठा दिलासा मिळाला अाहे.


फ्रीज २० हजार रु. स्वस्त

सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, व्डिडीओकाॅन, व्हर्लपूल, गोदरेज अादी कंपन्या फ्रीज बनवतात. सध्या बाजारात १६ हजार रुपये ते २ लाख रूपयांपर्यंतचे फ्रीज मिळतात. अाता फ्रीजचे दर १० टक्के घटणार अाहेत. त्यामुळे अाता १४ हजार ४०० रुपये ते १ लाख ८० हजार रुपये फ्रीजची किंमत होईल. नवीन किमती २७ जुलैपासून लागू होतील. 



हेही वाचा - 

 Exclusive: म्हाडा तोंडावर आपटलं! परळमधली २९ महागडी घर विजेत्यांनी केली परत

लवकरच येणार १०० रुपयांची नवी नोट





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा