Advertisement

चिनी बँकेकडून एचडीएफसीचे १.७५ कोटी शेअर्स खरेदी

भारतीय शेअर बाजारांमध्ये मागील एक महिन्यात प्रचंड मोठी घसरण चालू आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आता खूप खाली आले आहेत. याचाच फायदा आता चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने घेतला आहे.

चिनी बँकेकडून एचडीएफसीचे १.७५ कोटी शेअर्स खरेदी
SHARES

कोरोनाचा फटका जगभरातील शेअर बाजारांसह भारतीय शेअर बाजारांनाही मोठा बसला आहे. भारतीय शेअर बाजारांमध्ये मागील एक महिन्यात प्रचंड मोठी घसरण चालू आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आता खूप खाली आले आहेत.

याचाच फायदा आता चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने घेतला आहे. या चीनी बँकेने देशातील प्रमुख कर्जदार कंपनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच एचडीएफसीमधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने मार्चअखेरच्या तिमाहीमध्ये एचडीएफसीचे तब्बल १.७५ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. 

कोरोनामुळे शेअर बाजारातील कंपन्यांचे शेअर्स खालच्या पातळीवर आले आहेत. फेब्रुवारीपासून आतापर्यंत एचडीएफसीच्या शेअर्समध्ये तब्बल ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाचा मार्च २०१९ पर्यंत एचडीएफसीमध्ये ०.८० टक्के हिस्सा होता. हा हिस्सा मार्च २०२० मध्ये वाढून १.०१ टक्क्यांवर गेला आहे. पोहोचली आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीचे एकूण १ कोटी ७४ लाख ९२ हजार ९०९ शेअर्स खरेदी केले आहेत.

गेल्या महिनाभरात शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण पहायला मिळाली. सर्वच मोठ्या आघाडीच्या कंपन्यांबरोबरच एचडीएफसीच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली आहे.  गेल्या महिनाभरात एचडीएफसीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे. 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण

लक्षणे असलेल्यांचीच होणार चाचणी, मुंबई महापालिकेचा निर्णय

Coronavirus Updates: लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मासेमारीला परवानगी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा