Advertisement

पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, मुंबईत आहे 'इतकी' किंमत

विना अनुदानित एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) च्या दरात वाढ केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, मुंबईत आहे 'इतकी' किंमत
SHARES
Advertisement

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus Pandemic) प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन 5.0 जारी करण्यात आला आहे. यातच सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. देशातील देशातील तेल विपणन कंपन्यांनी HPCL,BPCL, IOC) विना अनुदानित एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) च्या दरात वाढ जाहीर केली. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे.

सोमवारी देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता मुंबईकरांना पेट्रोलची किंमत प्रति लिटर ७८.३२ तर डिझेल ६८.२१ रुपये उपलब्ध आहे.

१ जूनपासून महाराष्ट्र सरकारनं वाहनांच्या इंधनावर दोन रुपये उपकर आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ संपूर्ण राज्यात लागू होईल. पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) अनुक्रमे २६ टक्के २४ टक्के आहे.हेही वाचा

एलपीजी गॅस सिलिंडर महागला

लाॅकडाऊनचा मारुतीला फटका, 'अवघ्या' इतक्या कारची विक्री

संबंधित विषय
Advertisement