पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सोमवारी दर स्थिर होते. मात्र, मंगळवारी पेट्रोलचे भाव २९ ते ३१ पैशांनी, तर डिझेलचे दर २७ ते २९ पैशांने वाढवले आहेत.
मे महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ११ दिवस वाढ करण्यात आली आहे. मुंबईत आता पेट्रोल ९९.१४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९०.७१ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
दिल्लीत पेट्रोलची किंमत ९२.८५ रुपये प्रतिलिटर झाली असून डिझेल प्रतिलिटर ८३.५१ रुपयांवर गेले आहे. चेन्नईत पेट्रोल ९४.५४ रुपये प्रतिलिटर, डिझेल ८८.३४ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.९२ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.३५ रुपये झाली आहे.
दरम्यान, मध्य-पूर्वेत इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वाढत्या तणावाने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेलाच्या बाजारपेठेवर परिमाण होण्याची शक्यता आहे. देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.
हेही वाचा -